हुतात्मा जवान सोमनाथ तांगडे अमर रहेच्या घोषणांनी ओझर्डे दुमदुमले |Soldier | Satara |Sakal Media |

2021-04-28 837

कवठे (जि. सातारा) - ओझर्डे (ता. वाई) येथील हुतात्मा जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्‍या सोमनाथला अखेरचे डोळे भरून पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरातील ग्रामस्थ पाणावलेल्या डोळ्यांनी रस्त्याकडे वाट पाहात होते. हुतात्मा तांगडे यांचे पार्थिव रात्री त्यांच्या गावी ओझर्डे येथे पोचले. त्यानंतर शासकीय इतमामात हुतात्मा तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (व्हिडिओ- पुरुषोत्तम डेरे, कवठे)
#Soldier #SomnathTangde #Satara #Maharashtra


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires